पुणेमहाराष्ट्र राज्य

सभापती युवराज काकडे यांची कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट

प्रतिनिधी अशोक आव्हाळे

मांजरी (प्रतिनिधी): हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामाची झपाट्याने सुरुवात करत सभापती युवराज काकडे यांनी कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आरोग्य सुविधांची सविस्तर माहिती घेतली.
आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, औषधोपचार वेळेवर मिळावेत तसेच स्वच्छता, औषधसाठा, उपचार सुविधा, महिला प्रसूतीगृह याबाबत आवश्यक त्या सूचना सभापती काकडे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. तसेच नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा देण्यासाठी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याबाबतही त्यांनी कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन सूचित केले.
यावेळी बोलताना सभापती युवराज काकडे म्हणाले की, हवेली तालुक्यातील ७१ गावांमधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या व शाळांना अचानक भेटी देऊन तेथील समस्या प्रत्यक्ष पाहणार आहे. स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या पाहणीवेळी युवानेते संदेश आव्हाळे, पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी, माजी सरपंच संतोषदादा कुंजीर, माजी उपसरपंच भरत निगडे, संतोष कुंजीर, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अमर कुंजीर, विकास निगडे, चंद्रकांत बारवकर, संजय झेंडे आदी उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे तसेच कर्मचारी वर्गही यावेळी उपस्थित होता.
सभापतींच्या या अचानक भेटीमुळे आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने प्रशासनात हालचाल सुरू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व

admin@erp

कैलास सत्यार्थी कन्वर्जन मीटिंग, आढावा बैठक उत्साहात संपन्न.

admin@erp

Travel Update – Detroit named second best city for 2018 travel destinations

admin@erp

Leave a Comment