पद्धत : समस्थितीत उभे राहा. अंगठा आत घेऊनHCNMमूठ वळा. मुठीचा पृष्ठभाग समोरच्या बाजूला घ्या. वर दिलेल्या क्रिया क्र. ७ आणि ८ या पायऱ्यांप्रमाणे मान वर घ्या. ओठांचा चंबू बनवा. मनात आठपर्यंत आकडे मोजेपर्यंत तोंडाने श्वास आत घ्या. तोंड बंद करून गळा फुलवा. हनुवटी गळ्याला टेकवा. डोळे बंद ठेवा. मनात ३२ पर्यंत आकडे मोजत खांद्यांना ताकद लावून खालपासून वरच्या बाजूला फिरवा. हात सरळ ताठ ठेवा. कोपरात हात वाकू देऊ नका. मान सरळ करून मनात १६ अंक मोजेपर्यंत नाकाने श्वास बाहेर सोडा. खांदे हलवणे बंद करा. ही क्रिया तीन वेळा करा.लाभ : खांद्यांची हाडे आणि स्नायू शक्तिशाली बनतात. खांदे सुडौल आणि सुंदर बनतात. खांद्यांचे दुखणे दूर होते. मानेचे विकारही दूर होतात
next post
