प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) पुणे ६४ मीटर रुंद इनर रिंग रोड प्रकल्पासाठी मांजरी खुर्द, ता. हवेली येथील गट क्रमांक २५५ पैकी व इतर गटांमधील जागेच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. यासंदर्भात संबंधित खातेदारांची बैठक १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता मांजरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. २२, पुणे कार्यालयाकडून तलाठी, मांजरी खुर्द यांना याबाबत पत्र देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन समन्वय शाखेच्या आदेशानुसार संबंधित जमिनीची भूसंपादन मोजणी करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. उपअधीक्षक भूमिअभिलेख, हवेली यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, संबंधित प्रकरणातील भूसंपादन मोजणी झालेली असून त्यासंदर्भात संबंधित खातेदारांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
उपअधीक्षक भूमिअभिलेख, हवेली यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, संबंधित प्रकरणातील भूसंपादन मोजणी झालेली असून त्यासंदर्भात संबंधित खातेदारांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. या बैठकीत भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात संबंधित शेतकरी व खातेदारांना माहिती मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी मांजरी खुर्द येथील अनेक गट क्रमांकांचा समावेश असून, संबंधित सर्व खातेदारांनी बैठकीस उपस्थित राहून भूसंपादन प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संबंधित खातेदारांनी बैठकीस उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. २२, पुणे कार्यालयाकडून करण्यात आले आहे. संबंधित नोटीस व मोजण्यात येणाऱ्या गट क्रमांकाची यादी गाव कामगार तलाठी यांच्याकडे असून मांजरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे.
