प्रतिनिधी : नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. अंगठा आत घेऊन मूठ वळा. कोपरात हात वाकवून हाताचा कोपरापर्यंतचा भाग जमिनीशी समांतर ठेवा. श्वास घेऊन हात खांद्यांच्या रेषेत समोर आणा. मुठीचा पृष्ठभाग समोर ठेवा. श्वास सोडून हात पूर्वस्थितीत आणा. हीच क्रिया ५ ते १० वेळा करा.
लाभ : हात आणि खांदे यांचे दुखणे थांबते. मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग मजबूत बनतो. हात मोठे होतात. रखवालदार आणि सैनिक यांच्यासाठी हे आसन लाभदायक आहे.
