प्रतिनिधी /
माळशिरस, पुरंदर: शिवसेनेचे नेते शरद यादव यांच्या माळशिरस येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ममता ताई यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात शिवसेनेचे पहिले संपर्क कार्यालय असल्याचा उल्लेख ताईने केला. प्रत्येक गावामध्ये संपर्क कार्यालय असल्यास लोकांच्या समस्या मांडण्यास व सोडवण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली.
आदरणीय आमदार विजयबापू शिवतारे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या माळशिरस येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (PHC) इमारतीच्या कामास डॉ. ममताताई शिवतारे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी इमारतीचे बांधकाम, कामाचा दर्जा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना, शेतकरी बांधवांना व माता-भगिनींना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी हे काम अत्यंत तत्परतेने पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी मा. विजयबापूंचा हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद व जनहिताचा आहे अशी भावना ताईंनी व्यक्त केली.
शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ममताताई शिवतारे यांनी श्री क्षेत्र भुलेश्वर या ठिकाणी दर्शन घेतले. सकाळची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना नेते गणेश मुळीक, अविनाश बढदे, शिवसेना नेते ग्रामपंचायत सदस्य शरद यादव, माजी उपसरपंच राजाभाऊ गद्रे, महिला आघाडी प्रमुख शिल्पा यादव, महिला आघाडी गणप्रमुख मनीषा यादव, अशोक इंदलकर, पोपट बोरवके, राहुल यादव, रामदास यादव, बाळासाहेब गद्रे, भानुदास माने, चंद्रकांत बनकर, अंकुश मल्हारी यादव, विनायक आबा यादव, हरिभाऊ यादव, विलास दादा यादव, दिलीप गायकवाड, विकास यादव, अमीरभाई मुलानी, गणेश ढोले, विकास थोरात, शशिकांत जाधव, गणेश यादव, शरद किसन यादव, सागर यादव, आदेश यादव, अमोल वाघले, पांडुरंग कापरे, रामभाऊ यादव ग्रामस्थ उपस्थित होते.
