प्रतिनिधी / निलेश जगताप
शिक्रापूर: शाळा व्यवस्थापन समितीची निवड पी. एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूरच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद नाथा शिंदे आणि उपाध्यक्षपदी अमोल आदिनाथ बैलभर यांची निवड झाली, अशी माहिती मुख्याध्यापक चारुशीला लोखंडे यांनी दिली.
स्थानिक शिक्षणतज्ञ आणि सदस्यांची निवड शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक शिक्षणतज्ञ म्हणून नवनाथ गणपत सासवडे आणि सामाजिक आरोग्य कार्यकर्ता (आशा) कल्पना कैलास ढोकले यांची निवड पालक प्रतिनिधींमधून करण्यात आली आहे.
पालकसभा आणि सदस्यांची यादी समितीच्या ७५% सदस्यांची निवड पालकसभेद्वारे मुलांच्या पालक प्रतिनिधीकडून करण्यात आले. या सदस्यांमध्ये समाविष्ट आहेत:मिलिंद नाथा शिंदे,रत्नमाला रविंद्र इंगोले,अमोल आदिनाथ बैलभर शारदा सखाराम सोळंके,आसिफ चांदभाई तांबोळी,वैशाली संतोष गायकवाड,आरती तेजस भोगाडे,सिकंदर बाळा नंदागवळी सोनल प्रविण रासकर,सनी रोहिदास जाधव,ज्ञानेश्वर कैलास बांडे,अपर्णा नेताजी ढोले,भास्कर दयाराम शिरे,वैशाली सुनिल रंगारी,रविंद्र दशरथ इंगोले,पूनम अशोक गायकवाड,गणेश राधाकिसन मेढे,अश्विनी राजू डंभारे शिक्षक तज्ञासाठी बाप्पू गायकवाड यांनी आव्हान दिले होते.
शिक्षक प्रतिनिधी सदस्य म्हणून रविंद्र मारुती शिवरकर व संतोष गुंडीबा गावडे यांची एकमताने निवड झाली.शाळेच्या मुख्याध्यापक चारुशीला शंकर लोखंडे या सचिव पदावर कामकाज पाहतील.
सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी ही कार्यकारिणी कामकाज पाहणार आहे. यावेळी शिक्षण तज्ञ नवनाथ सासवडे बोलताना म्हणाले की उद्याच्या काळामध्ये शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहून शाळेतील सर्व शिक्षक पालक विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना विचारात घेऊन शाळेची गुणवत्ता बुद्धिमत्ता सामाजिकता तसेच शाळेच्या विकासामध्ये भरीव काम उभे करून शाळेला प्रगती पथावरती नेण्यासाठी कटिबद्ध राहू त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले
