प्रतिनिधी / नूतन पाटोळे
पद्धत : भाग क : समस्थितीत उभे राहा.
दोन्ही हात खांद्यांसमोर घेऊन जमिनीला समांतर पसरा. तळहात जमिनीच्या बाजूला करा. श्वास घेत दोन्ही घोटे जुळवून खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसा. श्वास सोडून पूर्वस्थितीत उभे राहा. ही क्रिया तीन वेळा करा.
भाग ख : दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत पसरा. श्वास घेऊन पायाच्या चवड्यांवर उभे राहा. गुडघे पसरून खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसा. श्वास सोडून पूर्वस्थितीला या. ही क्रिया तीन वेळा करा.
लाभ : मांड्या शक्तिशाली, सुंदर आणि सुडौल बनतात. गुडघेदुखी नाहीशी होते.
