प्रतिनिधी / नूतन पाटोळे
पद्धत : भाग क : समस्थितीत उभे राहा. श्वास आत घेऊन उडी मारून दोन्ही पावलांत अंतर घेऊन उभे राहा. दोन्ही हात खांद्याच्या बाजूकडून डोक्याच्या वर न्या. श्वास सोडून उडी मारून दोन्ही पाय आणि दोन्ही हात पूर्वस्थितीला आणा. ही क्रिया दहा वेळा करा.
भाग ख : श्वास सोडून उडी मारून दोन्ही पाय मांडीच्या बाजूला ताणून उभे राहा. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूंनी डोक्याच्या वर न्या. तळवे बाहेरच्या बाजूला ठेवा. श्वास सोडत उडी मारून हात आणि पाय पूर्वस्थितीला आणा. ही क्रिया दहा वेळा करा.
