पद्धत : समस्थितीत उभे राहा. श्वास आत घेऊन डाव्या पायाची टाच वर घेऊन नितंबावर मारा. श्वास सोडून पाय पूर्वस्थितीला आणा. पुन्हा श्वास घेऊन उजव्या पायाची टाच नितंबावर मारा. ही क्रिया दहा वेळा करा.
लाभ : कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी साहाय्य होते. शरीर पुष्ट आणि चैतन्यमय बनते. ज्ञानाचे संवर्धन होते. ब्रह्मचर्य आणि मोक्षप्राप्ती यांसाठी ही क्रिया साहाय्यभूत ठरते.
