वाघोली : उबाळे नगर येथील एसबीआय संस्कृती सोसायटीचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री गणपती उत्सवानिमित्त विशेष आकर्षण भव्य “नरसिंहा” या आकर्षक संकल्पनेवर आधारित भव्य डेकोरेशन साकारण्यात आले. ही संकल्पना व डेकोरेशन प्रविण शेलार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अथक मेहनत, कल्पकता आणि योगदानातून साकारण्यात आली.
या सुंदर कलाकृतीतून भक्ती, कला आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला भाविकांना मिळाला. या भव्य उपक्रमास मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. त्यात नगरसेवक शैलेजित (भाऊ) बनसोडे, नगरसेवक संदीप (आबा) सातव, युवा नेते नवनाथ भाऊ पठारे यांनी उपस्थित राहून गणपती उत्सव व नरसिंहा डेकोरेशनची पाहणी करून मंडळाला शुभेच्छा दिल्या.
