प्रतिनिधी/अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होत क्रीडादिनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक विजय बदक यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी दैनिक पुण्यनगरीचे भैरवनाथ बोराडे, शैलेश जगताप, अशोक आव्हाळे तसेच शाळेतील शिक्षकांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामुदायिक क्रीडा स्पर्धेची शपथ घेतली. मुख्याध्यापक विजय बदक यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची व भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
मुख्याध्यापक विजय बदक यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची व भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो-खो, लंगडी आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत क्रीडादिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
