प्रतिनिधी नूतन पाटोळे
पद्धत : दोन पायांच्या मध्ये एक हाताचे अंतर ठेवून उभे राहा. रे झुकून दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा१. मध्य नौली : उच्छ्वास पूर्वसोडून पोट रिकामे करा. आंतरिक शक्तीने रिकामे पोट मागे-पुढे हलवा. पोटाला आंतरिक शक्तीने आत खेचून घेऊन मध्य नौली बाहेर काढा. डाव्या हाताने डाव्या गुडघ्यावर दाब देऊन डावी नौली बाहेर काढा. अशाच प्रकारे उजव्या गुडध्याक दाब देऊन उजवी नौली बाहेर काढा. श्वास घेण्याची इच्छा झाली, की पोट हलवणे बंद करा. ही क्रिया तीन वेळा करा.२. वाम नौली: पुन्हा उच्छ्वास सोडून पोट रिकामे करा. उजव्या हाताने उजवा गुडघा किंचित दाबून आंतरिक शक्तीने रिकाम्या पोटाला डावीकडून उजवीकडे शक्य होईल तेवढे फिरवा. श्वास घेण्याची इच्छा झाली, की ही क्रिया बंद करा. याला ‘वाम नौली’ म्हणतात.३. दक्षिण नौली : श्वास सोडून देऊन पोट रिकामे करा. डाव्या गुडघ्यावर डाव्या हाताने किंचित दाब देऊन आंतरिक शक्तीने रिकामे पोट उजवीकडून डावीकडे फिरवा. श्वास घेण्याची इच्छा झाली की, ही क्रिया बंद करा. याला ‘दक्षिण नौली’ म्हणतात.
