प्रतिनिधी नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. ७ ते १२ क्रमांकांच्याक्रियांप्रमाणे मान हळूहळू वर करा. कावळ्याच्या चोचीसारखा तोंडाचा आकार बनवा आणि मनात आठपर्यंत आकडे मोजा. तोंडाने श्वास आत घेऊन तोंड बंद करून लगेच गाल फुगवा आणि हनुवटी गळ्याच्या हाडाजवळ टेकवा. १ ते ३२ पर्यंत अंक मोजा आणि तोपर्यंत श्वास रोखून धरा. त्यानंतर मान सरळ करत १६ पर्यंत अंक मोजत श्वास बाहेर सोडून द्या. ही क्रिया एक वेळ करा.
