प्रतिनिधी /नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. तळवे आतल्या बाजूला घेऊन हात मांडीच्या पुढच्या भागावर ठेवा. श्वास घेऊन दोन्ही हात वर न्या. हातांच्या मध्यभागी डोके ठेवून वर पाहा. कमरेतून पूर्णपणे मागे झुकून या अवस्थेत काही काळ थांबा. पुन्हा श्वास सोडत हळूहळू पहिल्या अवस्थेत या. ही क्रिया तीन वेळा करा.
