प्रतिनिधी /नूतन पाटोळे
भाग क : समस्थितीत उभे राहा. हाताच्या मुठी उघडून बोटे एकमेकांना चिकटवून दोन्ही हात खांद्याच्या समोर जमिनीशी समांतर पसरा. श्वास घेत तळव्याला ताकदीने हळूहळू खालून वर आणा. श्वास सोडत हाताचे तळवे हळूहळू वरून खाली घ्या. ही क्रिया पाच वेळा करा.
भाग ख : कोपरात हात वाकवून छातीच्या समोर जमिनीला समांतर पसरा. तळव्याचा भाग खाली करून भाग क प्रमाणेच बाकी सर्व क्रिया पूर्ण करा. ही क्रिया पाच वेळा करा.
