पद्धत : समस्थितीत उभे राहा.
भाग क : श्वास घेत डावा हात एका बाजूने
खांद्याच्या वर न्या. दंडाचा कानाला स्पर्श होऊ द्या. हाताचे तळवे बाहेरच्या दिशेला ठेवा. श्वास सोडत पूर्वस्थितीला या. ही क्रिया १० वेळा करा.
भाग ख : श्वास आत घेऊन उजवा हात एका बाजूने खांद्याच्या वर न्या. दंडाचा कानाला स्पर्श होऊ द्या. हाताचा तळवा बाहेरच्या बाजूला ठेवा. श्वास सोडत पुन्हा पूर्वस्थितीला या. ही क्रिया दहा वेळा करा.
भाग ग : श्वास घेत दोन्ही हात वरच्या बाजूला न्या. दंडांचा कानांना स्पर्श होऊ द्या. श्वास सोडत पुन्हा पूर्वस्थितीला या. ही क्रिया दहा वेळा करा.
लाभ : बाहू पुष्ट आणि बलशाली बनतात.
कोपरांपासूनचा मनगटापर्यंतचा भाग संतुलित बनतो आणि तेथील दुखणे दूर होते.
दंड शक्तिशाली बनून त्यांची कार्यक्षमता वाढते.
