प्रतिनिधी / नूतन पाटोळे
पद्धत : भाग क : समस्थितीत उभे राहा. डावा पाय जमिनीच्या समोर सुमारे नऊ अंशात वर उचला. चवडा गोलाकार फिरवून शून्याचा आकार तयार करा आणि पुसून टाका. श्वास सर्वसामान्य ठेवून हीच क्रिया तीन वेळा करा.
भाग ख : डावा पाय मागच्या बाजूला ताणा.
जमिनीपासून सुमारे नऊ अंशापर्यंत पाऊल वर उचला. चवड्याने शून्याचा आकार तयार करा आणि पुसून टाका. श्वासोच्छ्वास सामान्यपणे करत राहून हीच क्रिया तीन वेळा करा.
भाग ग : क भागाप्रमाणेच उजव्या चवड्याने तीन वेळा क्रिया पूर्ण करा.
भाग घ : उजवे पाऊल जमिनीपासून सुमारे ९ अंश मागच्या बाजूला ताणून धरा. भाग ख प्रमाणे तीन वेळा क्रिया करा.
लाभ : पायाची बोटे, चवडा, पायाचा पृष्ठभाग आणि तळवा यांचे दुखणे नाहीसे होते. पाय सुंदर, सुडौल बनतो. मुरगळणे दूर करण्यासाठी उपयुक्त व्यायामप्रकार आहे. जास्त चालणे किंवा पळणे यामुळे आलेला थकवा दूर होतो.
