प्रतितिधी / नूतन पाटोळे
पद्धत : दोन पायांच्या मध्ये एका हाताचे अंतर ठेवून उभे राहा. पुढे झुकून दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. १. मध्य नौली : उच्छ्वास पूर्ण सोडून पोट रिकामे करा. आंतरिक शक्तीने रिकामे पोट मागे-पुढे हलवा. पोटाला आंतरिक शक्तीने आत खेचून घेऊन मध्य नौली बाहेर काढा. डाव्या हाताने डाव्या गुडघ्यावर दाब देऊन डावी नौली बाहेर काढा. अशाच प्रकारे उजव्या गुडघ्यावर दाब देऊन उजवी नौली बाहेर काढा. श्वास घेण्याची इच्छा झाली, की पोट हलवणे बंद करा. ही क्रिया तीन वेळा करा.
२. वाम नौली : पुन्हा उच्छ्वास सोडून पोट रिकामे करा. उजव्या हाताने उजवा गुडघा किंचित दाबून आंतरिक शक्तीने रिकाम्या पोटाला डावीकडून उजवीकडे शक्य होईल तेवढे फिरवा. श्वास घेण्याची इच्छा झाली, की ही क्रिया बंद करा. याला ‘वाम नौली’ म्हणतात.
३. दक्षिण नौली : श्वास सोडून देऊन पोट रिकामे करा. डाव्या गुडघ्यावर डाव्या हाताने किंचित दाब देऊन आंतरिक शक्तीने रिकामे पोट उजवीकडून डावीकडे फिरवा. श्वास घेण्याची इच्छा झाली की, ही क्रिया बंद करा. याला ‘दक्षिण नौली’ म्हणतात.
क्र. २४ पासून ३३ पर्यंतच्या क्रियांचे लाभ :
१. पोटाचे सर्व विकार दूर होतात.
२. पोटाचे सर्व अवयव शक्तिशाली बनतात.
३. पोटावर साठलेली चरबी कमी होते.
४. आध्यात्मिक शक्तीचा विकास होतो.
५. साधक दीर्घायुष्यी बनतो.
६. कुंडली जागरणासाठी साहाय्य होते.
७. पचनसंस्थेचे कार्य जलद गतीने होऊ लागते.
८. नाभि-केंद्र व्यवस्थित ठेवण्यात साहाय्य होते.
९. रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊ लागते.
१०. शरीरातील सर्व नाड्यांची शुद्धी होते.
