प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : “शिक्षकांनी घडविलेला विद्यार्थी ही समाजाची खरी संपत्ती असते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक व्याख्याते डॉ. महेंद्र शिंदे यांनी केले.
मांजरी बुद्रुक येथील के. के. घुले विद्यालयात अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था आणि वैजयंती बेल्हेकर ग्रंथालय व वाचनालय यांच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी संस्था अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, पांडुरंग घुले, बाबासाहेब शिंगोटे, दिलीप घुले, दीपक घुले, पृथ्वीराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. शिंदे पुढे म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक आणि विश्वासू व्यक्ती म्हणून संवाद साधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”
वेळी डॉ. महेंद्र शिंदे यांच्या हस्ते रविंद्र निगडे, वैशाली मोहिते, डॉ. अश्विनी शेवाळे, राजेंद्रकुमार गदादे, अश्विनी बनकर, भगवान बेल्हेकर, मिलिंद कोबल,करुणा कंद, रमेश लोखंडे, किरण उगलमुगले आणि दत्तात्रय कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या तसेच प्रकाश रासकर व उषा राऊत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व फुलांचे रोपटे असे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली सोनावळे यांनी केले. बाबा शेलार व वंदना काजळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
