प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी खुर्द (प्रतिनिधी) : मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कार रुजावेत आणि ज्ञानाची व्याप्ती वाढावी, या उद्देशाने सामूहिक वाचन उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विविध पुस्तके, कथा, कविता तसेच शैक्षणिक साहित्याचे वाचन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वाचनाचा आनंद घेतला. “एकत्र वाचू… एकत्र वाढू… ज्ञानाच्या प्रकाशात…” या संदेशातून वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
वाचनामुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, शब्दसंपदा, कल्पनाशक्ती आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज नियमितपणे अवांतर वाचन करावे, असे आवाहन मुख्याध्यापक विजय बदक यांनी केले.
शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास तसेच वाचन संस्कार आणि ज्ञानवृद्धीला चालना मिळण्यास मदत झाली.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार , आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकरभाऊ मांडेकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवलबाबा जगदाळे, उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षण अधिकारी दहितुले मॅडम, तसेच जिल्हा परिषदेचे सभापती व अधिकारी यांच्या हस्ते तनिष्कचा गौरव करण्यात आला.
उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असून, तनिष्कने आपल्या अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
