प्रतिनिधी/नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा.
भाग क : अंगठा आत घेऊन मूठ वळा. दोन्ही हात खांद्याच्या समोर घेऊन जमिनीशी समांतर पसरा. हातांमध्ये दोन्ही खांद्यांमधील अंतराएवढेच अंतर ठेवा. हातांचे तळवे खालच्या बाजूला असू द्या. श्वास आत घेऊन मनगट ताकदीने हळूहळू खालून वरच्या बाजूला आणा. श्वास सोडून मनगट वरून खालच्या बाजूला वळवा. ही क्रिया पाच वेळा करा.
भाग ख : कोपरात हात वाकवून छातीच्या समोर जमिनीशी समांतर पसरा. अंगठा आत घेऊन मूठ बंद करा. उर्वरित क्रिया भाग क सारखीच करा.
लाभ : या सर्व क्रिया केल्याने मनगट, हाताचे तळवे, तळव्यांचा पृष्ठभाग आणि बोटे पुष्ट होतात आणि त्यांचा चांगला विकास होतो. तळवे शक्तिशाली बनतात. या क्रिया केल्याने मनोनहा नाड्यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे शरीर आणि मन एकाग्र होऊन आध्यात्मिक उन्नती होते. हातांमध्ये कंपन असेल तर ते दूर होते. सांधेदुखी नाहीशी होते. टाईपरायटरवर काम करणाऱ्या सर्व साधकांना याचा लाभ होतो.
