प्रतिनिधी/नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा.
भाग क : अंगठा आत घेऊन हाताची मूठ वळा. हात खांद्याच्या समोर आणि जमिनीशी समांतर पसरा. हात कडक बनवा. श्वास आत घेऊन रोखून धरा. हात वरून खाली अशा पद्धतीने दहा वेळा चक्राकार फिरवा. कोपरातून हात वाकवून कमरेला चिकटवा. श्वास सोडत हात जोरात समोर सोडून द्या.
भाग ख : भाग क प्रमाणे डावा हात खालून वरच्या दिशेने दहा वेळा फिरवा. हात कोपऱ्यामध्ये वाकवून कमरेला चिकटवा. श्वास सोडत हात समोर जोरात सोडा.
भाग ग : अंगठा आत घेऊन उजव्या हाताची मूठ वळा. खांद्याच्या समोर हात जमिनीशी समांतर पसरा. श्वास आत घेऊन रोखून धरा. उजवा हात वरून खालच्या दिशेने दहा वेळा चक्राकार फिरवा. कोपरातून हात वाकवून कमरेला चिकटवा. श्वास सोडत हात समोरच्या बाजूला जोरात सोडा. आता क्रिया समाप्त करा.
भाग घ : भाग ग प्रमाणे कृती करत दोन्ही हात खालून वरच्या दिशेने दहा वेळा फिरवा.
भाग च : अंगठा आत घेऊन मूठ बंद करा. दोन्ही हात खांद्याच्या समोर जमिनीशी समांतर पसरा. क आणि ग प्रमाणे कृती करून दहा वेळा हात वरून खाली फिरवून कृती पूर्ण करा.
लाभ : शरीराचे वातविकार दूर होतात.
हातांच्या नसा, नाड्यांचे आणि सांध्यांचे दुखणे नष्ट होते.
हातांचे सौंदर्य वाढते. भुजा शक्तिशाली आणि पुष्ट बनतात.
खांदे मजबूत होतात.
