प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
पद्धत : भाग – क : समस्थितीत उभे राहा. श्वास आत घेत असताना मान डाव्या खांद्याच्या बाजूला आणा. न थांबता मान उजव्या खांद्याच्या बाजूला न्या. श्वास सोडा. आता मान उजव्या खांद्याच्या रेषेत ठेवा. अशा प्रकारे हीच क्रिया दहा वेळा करा.
भाग ख : श्वास घेऊन मान खालून
वरच्या दिशेला न्या. वर पाहा. श्वास सोडून मान परत खालच्या बाजूला आणा.
लाभ : मानेचे सर्व दोष दूर होतात. गळ्याचा लठ्ठपणा कमी होतो. टॉन्सिल्सचे आजार गंडमाळा यांसारखे रोग बरे होतात. आवाज मधुर आणि गोड बनतो. तोतरेपणा आणि चाचरणे यांसारखे विकार दूर होतात. मान मजबूत आणि शक्तिशाली बनते.
