प्रतिनिधी / भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे : कासारी (ता. शिरूर) येथील सौ हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयातील ध्वजारोहण गुन्हे अन्वेशन विभागाचे उमाकांत कुंजीर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा.अभय हाके यांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी कवायत, देशभक्तीपर गीते, मनोगत व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तर स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. याप्रसंगी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, संचालक गुलाब सातपुते, तबन भुजबळ, दिलीप भुजबळ, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, संस्थेचे सचिव रोहन ढमढेरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष काकडे, प्रभारी मुख्याध्यापिका ज्योत्स्ना दरेकर, प्रा अभय हाके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब थोरात यांनी केले तर अरुण भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले.
