प्रतिनिधी /निलेश जगताप
शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सामाजिक कार्यकर्ते रामदास मामा थोरात यांची पुणे काँग्रेस आय कमिटी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वांमती बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळेस प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्याचे उत्तरचे अध्यक्ष कमलाकर दादा सातव पाटील, वैभव यादव उत्तरचे उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत व काँग्रेस आय कमिटीचे असंख्य कार्यकर्त्यांच्या सहभागातून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळेस त्यांचे महिला, तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी या वर्गामधून रामदास मामा यांचा सन्मान ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. यावेळेस कमलाकर सातव बोलताना म्हणाले की एका छोट्याशा गावांमधून रामदास थोरात यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, उद्योग, धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम केले आहे व काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळामध्ये पोचवण्यासाठी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.
त्यांचे हे काम पाहून काँग्रेस आय कमिटी पुणे जिल्हा यांनी त्यांच्यावर अतिशय महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे व त्या जबाबदारीचे निश्चित ते सोन करतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.त्यानंतर रामदास मामा थोरात बोलताना म्हणाले की आजदेशामध्ये भारतीय जनता पार्टीने महागाई, बेरोजगारी, शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांच्यावर कुठलेच ठोस निर्णय न घेता त्यांना देशोधडी लावली आहे.
परंतु काँग्रेसच्या काळामध्ये या देशांमध्ये सर्व स्तरातील लोक अतिशय समाधानी होते. म्हणून आज देशाला पुन्हा एकदा काँग्रेसची गरज आहे हे लक्षात घेता आम्ही सर्व कार्यकर्ते उद्या देशामध्ये काँग्रेस सरकार आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.
मला मिळालेल्या संधीचा उपयोग मी तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी निश्चित करेन व जास्तीत जास्त पक्षाला बळकटी देण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रामाणिक प्रयत्न करून देशामध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू असा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
