प्रतिनिधी /निलेश जगताप
वाघोली येथील अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघोली येथील शिक्षिका सौ सविता लांडे यांना पुणे येथील अण्णाभाऊ साठे नाट्य सभागृहामध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिनाची औचित्य साधून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सविता लांडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळेस प्रमुख उपस्थितीमध्ये दिलीप जी कांबळे, माजी राज्यमंत्री समाज कल्याण, माननीय श्री विक्रम दादा पाचपुते, विधानसभा सदस्य श्रीगोंदा, सौ सुरेखा बनगे, सहाय्यक आयुक्त पुणे मनपा, आणि सौ गौरीताई वना रसे, महाराष्ट्रातील पहिला संबळ वादक, सौ प्रतिभाताई चोरगे, प्रभाग अध्यक्ष पुणे मनपा यांच्या शुभहस्ते सविता लांडे यांना शाल, शिरफळ व सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळेस 175 शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळेस दिलीप कांबळे बोलताना म्हणाले की शिक्षक हा समाज व्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक उद्याची नवीन पिढी घडवण्यासाठी अतिशय जिद्दीन आणि धाडसाने काम करत आहेत. त्याचे निश्चित आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे आणि या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांनी सर्व पुरस्कार त्या शिक्षकांचे आभार व्यक्त केले.यावेळेस सविता लांडे पुरस्कार स्वीकारताना म्हणाले की शिक्षक दिनाचे औचित्य साधून जो काल माझा महाराष्ट्र प्रायमरी असोसिएशन राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन जोमाझा सन्मान झाला, तो माझ्या या सर्व विद्यार्थ्यांना अर्पित करते. शिक्षकांना भूतकाळातील दुवा व भविष्य काळातील दिवा म्हणून ओळखले जाते. केवळ हे भाग्य म्हणून शिक्षिक म्हणून आम्हा गुरुजणांच्या वाट्याला आले. विद्यार्थी हे माझे दैवत मानून त्यांच्यामध्ये ज्ञान, संस्कार व संस्कृतीची जाणीव करून देत आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगी ज्या विविध कला आहेत, उदा. खेळाच्या माध्यमातून, संघ भावना व नाते संबंध तसेच विविध सण, उदा. रक्षाबंधन, भाऊ बीज यांच्या माध्यमातून त्या सणांचे महत्त्व काय असते ते जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे.
आज हेच विद्यार्थी देशाचे उत्कृष्ट नागरिक कसे बनतील यासाठी माझे प्रयत्न आहेत.संत कबीर म्हणतात, “शिक्षक माझे गुरु आहे.”शेवटी माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी हे माझे दैवत मानतात आणि त्यांनी सर्व व्यासपीठाचे आयोजकांचे आभार व्यक्त केले.
