प्रतिनिधी /निलेश जगताप
टाकळी हाजी ,दि. ११ : शिरूर तालुक्यातील मलठण येथे संत सेना महाराजांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात गावातील असंख्य ग्रामस्थ आणि मातांनी सहभाग घेतला. हरिभक्त पारायण किरण महाराज भागवत यांचे संत सेना महाराजांच्या जीवन चरित्रावर अद्भुत किर्तन झाले. यावेळी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ज्यामध्ये शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुहास थोरात, आनंदा गायकवाड, दत्तोबा दंडवते सोसायटीचे चेअरमन नाना फुलसुंदर, माजी सरपंच प्रकाश गायकवाड, आणि संदीप भाऊ गायकवाड यांचा समावेश होता.
या कार्यक्रमात सौ नंदा सोशल फाउंडेशनने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले, ज्याचा लाभ मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी घेतला. कार्यक्रमाचे नियोजन मलठण येथील सर्व नाभिक बांधवांनी उत्कृष्ट पद्धतीने केले, ज्यामध्ये गणपतराव क्षीरसागर, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र क्षीरसागर, संतोष शिरसागर, भानुदास गायकवाड, अनिल गायकवाड, सुभाष गायकवाड, अशोक गायकवाड, सोमनाथ गायकवाड, राहुल शिरसागर, सचिन क्षीरसागर, संजय गायकवाड, दिवेश गायकवाड, किरण क्षीरसागर, रवी क्षीरसागर, ऋषिकेश गायकवाड, प्रतीक गायकवाड, यश गायकवाड, विशाल गायकवाड, शंकर क्षीरसागर, विवेक क्षीरसागर यांचा समावेश होता,
तसेच नाभिक समाजातील सर्व महिलांनी योगदान दिले.माजी आमदार पोपटराव गावडे यावेळी म्हणाले की, मलठणीतील नाभिक बांधवांनी संत सेना महाराजांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे सुंदर नियोजनात साजरी केली आहे. त्यांनी मलठण गावामध्ये सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले आहे, हे खरे मानावे लागेल. त्यांनी सर्व नाभिक बांधवांना भरभरून शुभेच्छा दिल्या, आणि यानंतर सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
