प्रतिनिधी / नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. सूक्ष्म व्यायामाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या क्रियेप्रमाणे डाव्या तळहाताचा अंगठा सोडून इतर सर्व बोटे गळ्यावर ठेवा. उजव्या हाताची तर्जनी डाव्या हातावर उलटी ठेवा. मान याच अवस्थेत ठेवून दोन्ही हात बाजूने खाली आणा. (अर्थातच, मानेला थोडेसे; म्हणजे सुमारे अर्धे बोटभर वर उचला.) श्वास बाहेर सोडून पोट आत ओढून घ्या. श्वास घेऊन पोट फुगवा. लक्ष पोटावर केंद्रित करा आणि न थांबता भराभरा ही क्रिया २५ वेळा करा.
