प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे हातांची बोटे एकमेकांशी जुळवून अंगठ्यांनी नाकपुड्या बंद करा. मान वरच्या बाजूला न्या. तोंडाचा चंबू बनवा. शिट्टी वाजवल्यासारखा आकार होईल. आता मनात आठपर्यंत आकडे मोजा आणि तोपर्यंत तोंडाने श्वास आत घेऊन लगेच तोंड बंद करा. गाल फुगवा. डोळे बंद ठेवा. हनुवटी गळ्याला चिकटवा. आता मनात ३२ पर्यंत आकडे मोजा आणि तोपर्यंत श्वास रोखून ठेवा. त्यानंतर मान सरळ करून नाकपुड्यांवरचे अंगठे दूर करा. मनात सोळापर्यंत आकडे मोजत श्वास बाहेर सोडा. श्वास रोखताना कनिष्ठिका किंवा करंगळी छातीवर ठेवा. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत सरळ ताठ ठेवा. हीच क्रिया तीन वेळा करा.
लाभ : साधक दीर्घायुष्यी बनतो. तहान भागते. होतात. दात बळकट बनतात आणि मुखदुर्गंधी दूर होते. तोंडाचे रोग दूर चेहरा प्रफुल्लित होतो. गालावरच्या सुरकुत्या, चेहऱ्यावरची मुरुमे नाहीशी होतात. सौंदर्यप्रसाधनांची डोकेदुखी, नेत्रदोष, पोटातील उष्णता, केस पिकणे, आवश्यकता भासत नाही. गळणे आदी विकार बरे होतात.
