शिरूर तालुक्यातील शिक्रापूर या ठिकाणी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आदर्श टेक्सटाईल मार्केट कापड दालनाचे भव्य दिव्य उद्घाटन असंख्य मान्यवरांच्या ग्रामस्थांच्या व माता-भगिनींच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळेस परिसरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस प्रामुख्याने शिरूर तालुका पंचायत समिती उपसभापती रामभाऊ सासवडे, शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे, युवा नेते मिलिंद नाना हरगुडे, युवराज अण्णा मांढरे, राम गिलबिले, रमाकांत गिलबिले व आदर्श टेक्सटाईल कापड दुकानाचे सर्वेसर्वा युवा उद्योजक निखिल सारंगकर, त्यांचे पिताश्री नारायण सारंगकर व मातोश्री सौ पुष्पा सारंगकर व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळेस अनेक मान्यवरांनी त्यांच्या या नवीन व्यवसायाला भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यामध्ये प्रामुख्याने पंचायत समिती उपसभापती रामभाऊ सासवडे व रमेश गडदे यांनी शुभेच्छा दिल्या. सर्वात शेवटी आभार व्यक्त करताना निखिल सारंगकर म्हणाले की, “ही माझी तिसरी शाखा मी आपल्या शिक्रापूरमध्ये सुरू करत आहोत.
पहिली शाखा खराडी व दुसरी शाखा केसनंद या ठिकाणी आहे. हा व्यवसाय सुरू करीत असताना अतिशय छोट्याशा जागेपासून सुरुवात केली होती, परंतु चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर व ग्राहकांच्या पाठिंब्यामुळे व माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे केसनंद या ठिकाणी तीस हजार स्क्वेअर फुटाचे भव्य दिव्य होलसेल गोडाऊन उभारू शकलो. गेली 35 वर्षांची ही व्यवसायाची माझी परंपरा प्रामाणिकपणे करू शकलो.
या माध्यमातून मी माझ्या मराठी उद्योजक तरुणांना सांगू शकतो की, नोकरी मागे पळण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांची गुलामी करण्यापेक्षा उद्योग व्यवसायामध्ये उतरून आपले स्वतःचे विश्व निर्माण करून आपल्या कुटुंबाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांबद्दल आदर या चार गुणांचा वापर करून आपण व्यवसायामध्ये निश्चित यशस्वी होऊ शकतो.” हा मोलाचा सल्ला निखिल यांनी सर्वांना दिला व त्यांनी सर्वांचे आभार मानले.
