प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : हवेली तालुक्यात पंचायत समिती तसेच विविध माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके व आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते रविवारी (दि. १३) उत्साहात पार पडले.
आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळीकांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच पालखी मार्गांच्या विकासकामांचा समावेश आहे.
हवेली तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध असून, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात विकासकामे पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी सांगितले.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, पंचायत समितीचे सदस्य कृषीराज चौधरी, सुदर्शन चौधरी, अमोल टेकाळे, सुषमा संतोष मुरकुटे, कोमल गणेश कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, उपअभियंता निरंजन जाधव, आव्हाळवाडीचे माजी सरपंच प्रशांत आव्हाळे, उपसरपंच अमोल आव्हाळे, पल्लवी नारायण आव्हाळे, सदस्य सोनाली दाभाडे, मांजरीचे माजी सरपंच रूपेश उंद्रे, निखिल उंद्रे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश ऊंद्रे, यशवंतचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, अशोक आव्हाळे, माजी संचालक तुकाराम पवार, बाजीराव भालसिंग, संतोष मुरकुटे, प्रशांत मदने, स्वप्नील उंद्रे, सोमनाथ भालसिंग, जयसिंग उंद्रे, योगेश मुरकुटे, सुभाष गायकवाड, थेऊर यशवंतचे माजी संचालक रामभाऊ कुंजीर, मारुती कुंजीर, चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त
दत्तात्रय कुंजीर, पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, काळूराम कांबळे, माजी उपसरपंच नितीन कुंजीर, दत्तात्रय कुंजीर पाटील, भरत कुंजीर, आबा काळे, मोहन कुंजीर, शरद राऊत, सुखराज कुंजीर, वंसत बोडके, जिजाबाकुंजीर, सुदाम काकडे, सिद्धार्थ कांबळे, सखाराम जाधव, रामदास चव्हाण, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सुरेश कुंजीर, डी एल कुंजीर, चंद्रकांत मेमाणे, नयन तुपे, बापू घुले, संदीप कुंजीर, अमर कुंजीर, संतोष शिंदे, अमोल लोंढे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, भाजप जिल्हाध्यक्षा पुनम चौधरी, संग्राम कोतवाल, उरुळीकांचनचे माजी सरपंच मयुर कांचन, भाऊसाहेब कांचन, सागर कांचन, माजी उपसभापती हेमलता बडेकर, सुभाष बगाडे, सुनील तांबे, रामभाऊ तुपे, प्रताप कांचन, भाऊसो तुपे, कदमवाकवस्तीचे प्रतिक काळभोर, सुशील महाराज काळभोर, अँड.सुजित कांबळे अशोक शिंदे, महेश खुळपे तसेच सर्वच गावचे सरपंच/प्रशासक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
