प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : शिक्षणासाठी परदेशात स्थायिक असलेल्या मांजरी खुर्द येथील आदित्य उंद्रे यांनी रशियातील स्मॉलएक्स शहरात मित्रपरिवारासह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
परदेशात शिक्षण घेत असतानाही भारतीय संस्कृती व परंपरांशी असलेली नाळ कायम ठेवत आदित्य उंद्रे यांनी मित्रांसोबत गणरायाची भक्तिभावाने पूजा केली. यावेळी मित्रपरिवाराने एकत्र येत आरती, प्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले.
रशियातील परदेशी भूमीत भारतीय पद्धतीने गणेशोत्सव साजरा केल्याने ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष रशियातही घुमला. या उपक्रमातून भारतीय संस्कृती आणि सण-परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला.
