प्रतिनिधी /नूतन पाटोळे
पद्धत : भाग क : दोन्ही हातांचे तळवे
पसरून खांद्याच्या समोर जमिनीला समांतर ताणून धरा. श्वासोच्छ्वास नेहमीप्रमाणे सर्वसामान्यपणे करत १०-१५ वेळा बोटांचा अग्रभाग ताकदीने वरून खाली वाकवा.
भाग ख : हात कोपरात वाकवून छातीसमोर जमिनीला समांतर ताणून घ्या. भाग क प्रमाणे तळवे पसरा. १०-१५ वेळा क्रिया करा.
लाभ : क्रिया क्र.
लाभ : या सर्व क्रिया केल्याने मनगट,
तळव्याचा पृष्ठभाग, तळवा आणि बोटे पुष्ट बनतात आणि त्यांचा विकास होतो. हात शक्तिशाली बनतात. या क्रिया केल्यामुळे मनोवहा नाड्यांवर परिणाम होतो. त्यांच्यामुळे शरीर आणि मन एकाग्र होते आणि आध्यात्मिक उन्नती होते. हात थरथरत असतील, कंप पावत असतील, तर हा आजार दूर होतो. सांध्यांच्या वेदना नाहीशा होतात. संगणकावर काम करणाऱ्या साधकांना लाभ होतो.
